कोल्हापूर प्रतिनिधी -
कोल्हापूर शहरातील आयटी पार्क विकसित करण्यासाठी केपीएमजी कंपनीकडून येत्या आठवड्यात प्रस्तावित आराखडा महापालिकेडे सादर केलं जाणार आहे. याबाबत आवश्यक ज्यांना सूचना द्यायचा असतील त्यांनी दोन दिवसात आय टी असोसिएशनकडे आपल्या सूचना द्याव्यात अस आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरातील आयटी पार्क विकसित करण्यासंदर्भात आज आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली. यावेळी रोहन तस्ते यांनी कोल्हापूर आयटी पार्कसाठी केपीएमजी कंपनीकडून प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला असल्याचे संगीतले. यावेळी त्यांनी प्रस्तावित आराखड्याची सर्व माहिती दिली. पायाभूत सुविधा उपलब्द करून देण्याबरोबरच या ठिकाणी आयटी पार्क विकसित करून हॉटेल आणि शॉपिंग प्लाझाही करता येते अस सांगितलं. यावेळी आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक कंपन्यांना पन्नास टक्के जागा राखीव ठेवाव्यात अशी मागणी केली. यावर
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी बाहेरची मोठी कंपनी आल्यावर इथल्या स्थानिक लहान कंपन्यांसाठी जागा राखीव ठेवूया. जिल्हा आयटी फर्म स्थापन करून याबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होतील. तुला दृष्टीने प्रयत्न करूया, आयटी असोसिएशन आणि प्रशासन असं प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करू, त्यासाठी ऑफिशियल समिती गठीत करू अस पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. केपीएमजी कंपनीचा प्रस्तावित आराखडा सादर करण्यापूर्वी आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी ज्या आवश्यक सूचना आहेत त्या आयटी असोसिएशनकडे दोन दिवसात द्याव्यात अस अवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. कोल्हापूरात आयटी पार्क विकसीत होण्यासाठी सकारात्मक पाऊले टाकण्यात येतील अस पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आयटी असोसिएशनचे ओंकार देशपांडे, अद्वित दीक्षित, स्नेहल बियाणी, प्रसन्न कुलकर्णी, विश्वजित देसाई, कैलास मेढे, रोहन तस्ते, शांताराम सुर्वे, केतन वायकर, कौस्तुभ नाबर, विनायक पद्माने, प्रकाश पुणेकर, मनीष राजगोळकर, राजा धवन आदी सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment