▼
Tuesday, 19 May 2020
नंदगाव व परिसरात कडक लॉकडाऊनचा निर्णय
नंदगाव प्रतिनिधी :नंदगाव , ( ता करवीर ) व परिसरातील ग्रामपंचायतीच्यावतीने व गावातील कोराना दक्षता समिती आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासन इस्पूर्ली यांच्या वतीने कडक लॉकडाऊन चा निर्णय घेतला आहे. गावापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हणबर वाडी ( ता - करवीर ) येथिल १३ वर्षाच्या शाळकरी मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने विशेष दक्षता घेण्यात येत आहे . तो कोरोना पॉझिटिव्ह मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मावशीकडे गोवा येथे गेला होता . कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने त्याला वडीलांनी गावाकडे आणले होते . परिसरातील ग्रामपंचायतीनी खबरदारीचा उपाय म्हणून निमशासकिय , सहकारी , खाजगी , नोकरदार तसेच सर्व स्तरावर काम करणारे मजूर व ग्रामस्थ यांनी कोणत्याही कारणास्तव गावाबाहेर जाण्याचे नाही व गावाबाहेरील अन्य व्यक्तींना गावात प्रवेश करण्याचे नाही , आढळल्यास त्याचे वरती संचारबंदीचे उल्लघंन केले बद्दल कायदेशीर कडक कारवाई केली जाणार आहे तसेच . कामानिमीत्य परगावी गेलेली व्यक्ती गावात परत आल्यास १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . तसेच विना मास्क गावात फिरणारी कोणतीही व्यक्ती आढळून आल्यास शंभर रूपये दंड ग्रामपंचायतीच्यांकडून आकारण्यात येते आहे .
No comments:
Post a Comment