*
कार्यशाळेत बियाणे तयार करण्याचे कृषी मंडळ अधिकाऱ्यांनी दिले प्रशिक्षण
.
प्रतिनिधि कारंजा :*आरिफ़* *पोपटे*
कारंजा तालुक्याती काजळेश्वर उपाध्ये : पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने कारंजा कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी शासन
सूचनेनुसार कृषी विभाग शेतकऱ्यांचे दारी हा नावीन्य पूर्ण उपक्रम राबवित असून उकर्डा ;पानगव्हान शिवारात शेती असणाऱ्या काजळेश्वरचे शेतकऱ्यांना खरीप पुर्व प्रशिक्षिण कार्यशाळा दि .२९ मे रोजी संध्याकाळी काजळेश्वर येथे घेण्यात आली .
वृत्त असे की पेरणीचे दिवस जवळ येत असतांना शेतकरी यांना घरगुतीबीयाणे तयार करणे ;बीज
प्रक्रीया व बीयाण्याची उगवण शक्ती
तपासणे ;बीयाण्याला पेरणीपुर्व बुरशीनाशकलावणे ;उतारावर आडवी पेरणी करणे इत्यादीबाबतची माहीती कार्यशाळेत प्रत्यक्ष लॅपटॉपचे माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी मंडळ अधिकारी संतोष चौधरी यांनी सखोल माहीती दिली . तसेच शेतीचा बियाणे खर्च कमी करूण तंत्रज्ञानाचा वापर करून
उत्पादन कस वाढविता येईल याबाबतची वैज्ञानिक तांत्रीक मार्गदर्शन कृषी सहायक निलेश घाडगे पाटील यांनी केले तर पीक उत्पादन वाढीसाठी व लागवडीचा खर्च कमी करण्याचे अनुशंगाने माहीती कृषी सहाय्यक चंदण राठोड
यांनी दिली . तसेच उताराला आडवी पेरणी व बी.बी.एफ. तंत्रज्ञान म्हणजे सरी वरंबा पद्धतीची पेरणी याबाबत सखोल मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी संतोष चौधरी तसेच कृषी सहाय्यक राम मारगे यांनी शेतकऱ्यांना दिली . कार्यशाळा तुळशीरामजी उपाध्ये यांचे अध्यक्षतेखाली पार पडली . मार्गदर्शक तसेच प्रमुख उपस्थीतीत कृषी मंडळ अधीकारी संतोष चौधरी ;कृषी सहाय्यक निलेश घाडगे पाटील ;चंदन राठोड : राम मारगे मान्यवर होते . कार्यशाळेला विनोद पा . उपाध्ये ' तंटामुक्ती अध्यक्ष देवानंद उपाध्ये ;मुकेश उपाध्ये ;नकुल उपाध्ये ;वैभव उपाध्ये परशु तिडके
दिनेश लाहे ;विवेक उपाध्ये ;संतोष उपाध्ये इत्यादी शेतक -यांची उपस्थिती होती .कोरोणा महामारी लक्षात घेता शासन सूचनांचे पालन करुन कार्यशाळा संपन्न झाली .
शेती लागवड खर्च कमी करूण सोयाबीन ;तूर उत्पादण वाढीसाठी कारंजा कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शनात कृषी विभाग शेतकऱ्यांचे दारी उपक्रमानुसार शेतकऱ्यांना बीयाणे उगवण शक्ती ;बीजप्रक्रीया बुरशीनाशकाचा वापर ;बी.बी.एफ. तंत्रज्ञान ;उताराला आडवी पेरणी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्नांची सोडवणूक मार्गदर्शन कार्यशाळा घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या बांधावर खत बी बीयाने उपक्रमा प्रमाणे सदर उपक्रम कृषी विभाग करीत आहे .
संतोष चौधरी
कृषी मंडळ अधीकारी कारंजा .
No comments:
Post a Comment