Saturday, 30 May 2020

टोळधाड संदर्भात जि. प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी घेतली कृषी विभागाची विशेष बैठक

  * 

शेतकऱ्यांनी  विशेष  काळजी  घेण्याचे  केले  आवाहन
उदगीर प्रतिनिधी :- गणेश मुंडे
राजस्थान,मध्य प्रदेश मधून  टोळ धाड महाराष्ट्रात  सीमावर्ती  भागात  आली  असून  यासाठी  विशेष  खबरदारी  बाळगण्याची  गरज  आहे.यासाठी  लातूर  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  राहुल केंद्रे यांनी  कृषी विभागातील  अधिकारी  आणि  तज्ज्ञ  यांच्यासोबत विशेष  बैठकीचे  आयोजन  केले  होते.वाळवंटी टोल किंवा नाकतोडे ही  किडीची  एक महत्वाची  जात आहे. वाळवंटी टोळ ही कीड मोठ्या प्रमाणात पिकांचे व इतर वनस्पती झाडाझुडपांचे नुकसान करते या किडीच्या दोन अवस्था  आहेत, जेव्हा हे किडे एक एकटे अवस्थेत असतात तिला एकटी अवस्था असे म्हणतात जेव्हा ही कीड सामूहिक आढळून येते तेव्हा तिला समूह असे म्हणतात समुहा अवस्थेत तर ही कीड मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. सद्यपरिस्थितीत राजस्थान गुजरात मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यामध्ये वाळवंटी टोळ्या आढळून येतात.या पूर्वीही किडीचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे या आधीचं 1926 ते 1931 मध्ये, 1949 ते 1955, 1962,1978  व 1993 मध्ये सुद्धा या किडीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून या किडीने आपल्या शेतात प्रवेश करू नये याकरिता वेगवेगळ्या उपाययोजना सुचविण्यात आल्या. 
शेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदणे तसेच वाद्य वाजवणे,  मोठ्याने आवाज करणे.संध्याकाळी रात्रीच्या वेळी ही  टोळधाड झाडाझुडपांवर  जमा होतात त्यावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यास नियंत्रण होते. 
 वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करून टोळधाड नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे. यासह विविध उपायांवर चर्चा करण्यात आली व योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आल्या. 
टोळ धाडीचा  विशेष बंदोबस्त करण्यासाठी आज दिनांक 28 मे 2020 रोजी विशेष बैठक लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला कृषी सभापती गोविंद चिलकुरे,समाजकल्याण सभापती रोहीदास वाघमारे, जिल्हा परिषद कृषी समिती सदस्य महेश पाटील,कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर कांबळे,कृषी विद्यावेत्ता डॉक्टर सूर्यवंशी,मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन दिग्रसे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने,कृषी विकास अधिकारी एस आर चोले,उपविभागीय कृषी अधिकारी महेश तीर्थकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment