तोंडार ग्रामपंचायत तर्फे नागरिकांना मास्कचे वाटप.
उदगीर प्रतिनिधी गणेश मुंडे :
उदगीर तालुक्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाच्या वतीने योग्य ती उपाययोजना राबवत आहे. त्यातच उदगीर तालुक्यातील तोंडार ग्राम पंचायत चा वतीने गावातील वयोव्रद्ध व नागरिकांना मोफत मास्क चे वाटप सरपंच सौ.शैलेजा पटवारी यांचा हस्ते वाटप करण्यात आले.
उदगीर शहरामध्ये येथील एका ६८ वर्षीय व्रद्ध महिलेचा निधनानंतर उदगीर प्रशासन जागे झाले व संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत ने खबरदारी व लोकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणुन तोंडार ग्रामपंचायत ने गावातील सर्व वयोवृद्ध लोकांची जनगनना करुन आशा वर्कर यांचा माध्यमातुन मोफत मास्क चे वाटप सरपंच सौ.शैलजा माधव पटवारी , उपसरपंच निळकंठ बिरादार,ग्राम सेवक सी.सी.शेळके यांचा हस्ते सामाजिक अंतर जोपासुन हजारो व्रद्धांना वाटप करण्यात आले.
या वेळी आरोग्य उपकेंद्राचे परिचारीका श्रिमती गिरी, ग्राम पंचायत चे सदस्य,आशा वर्कर श्रिमती भारत मनोहर कांबळे, अनिता कोचेवाड,बबीता सोनकांबळे,विमल कोचेवाड,लिपिक दत्ता बिरादार,माधव पटवारी व गावातील नागरिक मोठया संख्येने आपली सुरक्षा जोपासुन मास्क बांधुन सामाजीक अंतर ठेउन उपस्थित होते.
No comments:
Post a Comment