कोरोना विरुद्ध लढणाऱ्या प्रशासनाचा गडमुडशिंगीत सत्कार
गांधीनगर:प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
ता. ३
कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात लोकांनी सुरक्षित रहावं या करीता प्रशासन दिवस रात्र काम करत आहेत. याबाबत कृतज्ञता व्यक्त करीत गडमुडशिंगी ता.करवीर येथे या सर्व कोरोना योद्धांचा सत्कार गावातील चंदेरी महिला बचत गटातील महिला व भुषण रियल इस्टेटचे अभिजित जाखले व त्यांचे सहकारी यांच्या वतीने करण्यात आला.
या मध्ये पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाचे डॅाक्टर व कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच आणि सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी, महसुल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी व कर्मचारी, विज वितरण चे कर्मचारी आशा व अंगणवाडी सेविका प्राथमिक शाळेतील शिक्षक व ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समिती सदस्य तसेच आवश्यक सेवा देणारे विभागचे लोक हे आपल्या जिवाची पर्वा न करता लोकांच्या करीता रस्त्यावर उतरुन काम करत आहेत. त्यांच्या या कामाची मनापासून कृतज्ञता, आभार व कोरोनाला हरविण्याच्या लढाईत सामील सर्वांचे यथोचित सन्मान करावा या हेतूने हा सत्कार सोहळा घेतल्याचे अभिजित जाखले यांनी मनोगतात व्यक्त केले.
विशेष उल्लेखनीय काम केलेबद्दल साहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक भांडवलकर, गांधीनगर पोलीस ठाणे व त्यांचे सर्व सहकारी, गडमुडशिंगीचे सरपंच तानाजी पाटील, आरोग्य सेविका प्रा. आ. केंद्र गडमुडशिंगी संध्या महाजन,माजी सरपंच सौ. कविता सातपुते, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, विज वितरण चे कर्मचारी, यांचा सत्कार करणेत आला. सत्काराचे आयोजन भूषण रियल इस्टेटचे अभिजित जाखले व त्यांचे सहकारी तसेच चंदेरी महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री पाटील, सचिव कल्पना मडिवाळ, दिपाली पाटील, नम्रता पाटील, गटाच्या महिला व ग्रामस्थ यांनी केले.
No comments:
Post a Comment