पेठ वडगांव / वार्ताहर - सरकारने वाईन शॉपला परवानगी दिली त्याप्रमाणे सलून चालू करण्यास परवानगी दयावी अशी वडगांव नाभिक समाजाकडून होत आहे
केश कर्तनालयावर आमची रोजी रोटी चालते.गेले दीड महिने हाताला काम नसल्याने ब-याच सलून चालक कुटुबांवर उपासमारीची वेळ आली आहे.दारू दुकाने सायंकाळपर्यंत सुरू ठेवली जात आहेत.आमच्या रोजी रोटी साठी किमान दुपार दोन पर्यंत तरी सलून चालू करण्यास परवानगी दयावी त्यामुळे किमान दोन वेळच्या पोटाचा प्रश्न मिटेल त्यामुळे याबाबत शासनाने गांभिर्याने विचार करावा अशी मागणी केली आहे