क्रिडाई बिल्डर्सच्या वतीने कोव्हिड रुग्णालयास पीपीई किटचे वाटप
--
उदगीर प्रतिनिधी:गणेश मुंडे उदगीर
येथील कोविंड रुग्णालयात काम करत असलेल्याना उदगीर क्रिडाई बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने कोरोना लागण झालेल्या रुग्णांची सेवा करत असलेले डॉक्टर व आरोग्य सेविका आणि कर्मचाऱ्यांसाठी एकुण 50 सुरक्षारक्षक पीपीई किटचे वाटप उदगीर तालुक्याचे उपजिल्हाधिकारी डाॅ प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी उदगीर तालुक्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे,उदगीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंकुष चव्हाण,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतिष हरिदास,सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार उपस्थित होते.कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध सामाजिक संस्था पुढे येऊन अडचणीत असलेल्या घटकांना मदत करण्याचे काम करीत आहेत.
यावेळी संघटनेचे सचिव अजय पाटील,शिवाजी बिरादार,शिवकुमार पांडे, प्रशांत जगताप,बाळु पारसेवार यांच्या उपस्थितीत असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी,सदस्यांच्या वतीने या कीडचे वाटप करण्यात आले.