Monday, 11 May 2020

mh9 NEWS

मदत करण्याचा अनोखा प्रकार... सत्य घटना

मदत करण्याचा अनोखा प्रकार... सत्य घटना.
गल्लीतील पोरांची ट्यूशन घेणारया एका ताईच्या घरी पीठ आणि भाजीपाला नव्हता. पण कायम मानानं जगणारी ही महिला बाहेर येवून मोफत रेशनच्या लाईनमध्ये उभं राहायला शरमत होती .

मोफत रेशन वाटप करणारया तरूणांच्या जसा हा प्रकार लक्षात आला तसा त्यांनी गरिब गरजवतांना काही वेळा पुरतं मोफत पीठ व भाजीपाला वाटप करणं थांबवलं.

शिकली सावरलेली पोरं होती ती. आपसात चर्चा केली आणी चर्चेमध्ये असं ठरलं की , ना जाणो कित्येक गरजू मध्यमवर्गीय लोकं मोठ्या अपेक्षेने मोफत रेशनच्या लाइनकडे बघत असतील पण आपल्या आत्मसम्मानामुळे ते त्या ठिकाणी येवू शकत नाहीयेत. 

विचार विनिमया नंतर झाल्यानंतर त्या तरूणांनी मोफत रेशन वितरणाचा बोर्ड बदलला व दुसरा बोर्ड लावला. 

ज्यावर लिहिलं होतं की , 

"स्पेशल ऑफ़र"

1. सर्व प्रकारचा भाजीपाला : 15 रूपये किलो, 
2. मसाले :  मोफत .
3. दाळ - तांदूळ -पीठ: 15 रूपये किलो..

बोर्डवरची सूचना वाचून भिकारी व गरीबांची गर्दी कमी झाली व मध्यमवर्गीय परिवारातील गरजू लोकं हातात दहा वीस पन्नास रूपयांची नोट पकडून खरेदी करण्याच्या लाईनमध्ये उभे राहीले. आता ते निश्चिंत होते व त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागणारी गोष्ट होणार नव्हती.
ह्याच लाईनमध्ये ट्यूशन घेणारी ताई पण आपल्या हातात थोडेफार पैसे घेवून उभी होती व तिचे डोळे पाणावले होते पण त्यात बुजरेपणा नव्हता.  

तिची वेळ आली, तिनं आवश्यक वस्तू व जिनसा घेतल्या, पैसे दिले व शांत चित्ताने घरी आली. सामानाची पिशवी सोडली. बघितलं तर जे पैसे तिने वस्तू खरेदीला दिले होते ते सगळे पैसे त्या पिशवीत होते. 

त्या तरूण पोरांनी तिचे पैसे त्या थैलीत परत केले होते.  

पोरं प्रत्येक खरेदी करणाऱ्या सोबत असंच करत होते.  

 ही सभ्यपणाची त्यांची वर्तणूक खरच खूप श्रेष्ठ होती. 

मदत जरूर करा पण कुणाचाही स्वाभिमान न दुखावता. गरजवंत व्हाईट काॅलरवालेही आहेत पण त्यांच्या आत्मसन्मानाची कदरसुध्दा करा.

आणि हे लक्षात ठेवा की आपल्या सेल्फी पेक्षाही जास्त दुसऱ्याचा आत्मसन्मान असतो. 

सोशल मिडियावरुन साभार
आवडले तर जरुर शेअर करा 

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :