कोल्हापूर प्रतिनिधी
कोरोना पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केला गेला आणि इतर दुकानांबरोबर पानपट्टीला सुद्धा बंदी घातली होती. आज जवळपास दोन महिने झाले इतर व्यवसाय सुरु झाले तरी पानपट्टी बंदच आहे. पानपट्टीचालकसुद्धा माणूसच आहे. त्याला व्यवसाय बंदीमुळे जगणे मुश्किल झाले आहे. अटी, शर्ती घालून व्यवसायासाठी पुन्हा परवानगी मिळावी म्हणून कोल्हापूर पानपट्टी चालक संघटनेमार्फत कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. जिल्ह्याचे खासदार माननीय संजय मंडलिक यांच्यामार्फत पानपट्टी ची दुकाने चालू करण्यास परवानगी द्यावी , अशा आशयाचे निवेदन दिले.
यानंतर पालकमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांनाही निवेदन दिले.
यावेळी संघटनेचे वतीने श्री रमेश ठोंबरे, श्री संजय सराटे, श्री शिवाजी घोटणे, श्री अतुल प्रभावळे इतर अनेक पान शॉप सदस्य हजर होते.
No comments:
Post a Comment