(प्रतिनिधी - वैभव करवंदकर)
नंदुरबार तालुका विधायक समितीच्या अध्यक्ष पदी मनोज बटेसिंग रघुवंशी यांची निवड झाली आहे. तसेच उपाध्यक्ष पदी अँड. राजेंद्र बटेसिंग रघुवंशी यांची निवड झाली. कार्यकारणी सदस्य म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष अँड राम रघुवंशी व नंदुरबार नगर पालिकेचे नगरसेवक यशवर्धन रघुवंशी (लकी भैय्या) यांची निवड झाली आहे. नंदुरबार तालुका विधायक समिती (एन.टि.व्हि.एस्) चे अध्यक्ष मनोज रघुवंशी त्यांच्या मातोश्री स्व. विमलताई रघुवंशी यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते मनोज रघुवंशी हे संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
नंदुरबार तालुका विधायक समितीच्या सुमारे 62 विविध शाखा आहेत, त्यात प्रामुख्याने वरिष्ठ महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळा, आश्रमशाळा, शिक्षण शास्त्र महाविद्यालय, विधी महाविद्यालय आदी शाखा कार्यरत आहेत. स्व.बटेसिंग रघुवंशी यांच्या निधनानंतर विमलताई रघुवंशी यांनी चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारली असा निर्णय विश्वस्तांनी घेतला होता. मात्र त्यानंतर स्व. विमलताई रघुवंशी यांच्या निधन झाले त्यांच्या निधनानंतर उपाध्यक्षपदी कार्यरत मनोज रघुवंशी यांची एकमताने संस्थेच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे.