Monday, 11 May 2020

प्रहार संघटनेकडून दिव्यांगाला सायकल वितरण

प्रहार संघटनेकडून दिव्यांगाला सायकल वितरण 

विनोद पाटील, शिगाव
शिगाव: फारणेवाडी (ता. वाळवा) येथील दिव्यांग विलास जाधव यांना प्रहार संघटने कडून तीनचाकी सायकल देण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष ओंकार वरूटे व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सायकल देण्यात आली यावेळी  विलास जाधव यांनी दखल घेतल्या बद्दल आभार व्यक केले. 
              गेली कित्येक वर्षे झाले विलास जाधव हे शासनाच्या तीन चाकी सायकल पासून वंचीत रहावे लागले आहे. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने व त्यांना मदतीचा हात देखील देणारे कोणी भेटले नव्हते अशातच शिगाव येथील प्रहार युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष ओंकार वरूटे यांना ही माहिती समजताच त्यांनी संघटनेच्या वरिष्ठ अधिकारी रामदास कोळी व अन्य यांना फोन वरून माहिती व फोटो पाठवले असता वरिष्ठांनी त्वरित दखल घेत सायकल पाठवून दिली. यावेळी अध्यक्ष ओंकार वरूटे म्हणाले शासनाच्या विविध योजना आहेत. पण लोकांना माहीत नाहीत त्या सामान्य माणसाला मिळत नाहीत जर मिळाल्या तर त्या बगल बच्चे यांनाच मिळतात. खरे गरजू लोक नेहमीच वंचीत राहत असतात. समाजातील आशा वंचीत घटकांना आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने नेहमीच मदतीचा हात देत आलो आहे यापुढील काळात देखील देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. समाजातील आशा गरजुनी संपर्क साधण्याचे यावेळी त्यांनी आवाहन केले. यावेळी जाधव यांना मास्क व सॅनिटायझर वाटप देखील करण्यात आले. 
         यावेळी प्रहार शेतकरी जिल्हा संघटना अध्यक्ष दिग्विजय पाटील, शुभम पाटील,ओंकार पाटील, ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्स ठेवून सायकल वितरण करण्यात आली.

No comments:

Post a Comment