Wednesday, 13 May 2020

थोडसं अपरिचित पण वाचनीय

थोडंसं अपरिचित पण वाचनीय 
अमुक तारखेवर जन्माला आला म्हणून नशीब घडत नाही तर आपल्या कर्तुत्वाचा ठसा असामान्य व्यक्ती त्या तारखेवर उमटवून त्या तारखेला असामान्य महत्त्व प्राप्त करून देतात. 
अशीच आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. त्यांना त्रिवार मुजरा. 

संभाजी राजे यांनी गनिमी कावा च्या पुरेपूर वापर करत औरंगजेबाला जेरीस आणले होते. संभाजी राजे यांनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. त्यात महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांनी १२० पैकी एकही लढाई हारली नाही. संभाजी राजे असे एकमेव योद्धा होते ज्यांनी असा इतिहास घडवला होता. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य वाढेल आणि मराठा साम्राज्य मातीस मिळेल अशी आशा बाळगून बसलेल्या औरंगजेब ला कित्येक वर्षात एक सुद्धा विजय मिळाला नसल्याने तो जेरीस आलाा. 

No comments:

Post a Comment