Sunday, 10 May 2020

गो .शिरगाव येथील शिवारात गवा शिरला .नागरीकात भितीचे वातावरण .

गो .शिरगाव येथील शिवारात गवा शिरला .नागरीकात भितीचे वातावरण ..
कंदलगाव - प्रकाश पाटील
      येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरातील भुजंगा पाटील यांच्या घराशेजारील ऊसाच्या शेतात गवा बसल्याचा शेतकरी भुजंगा पाटील यांच्या नजरेस पडला . त्यांनी गावातील सरपंच , पो . पाटील यांना घटनेची माहिती देऊन पोलिसांना पाचारण केले . 
       आज सकाळी ७ वा .च्या दरम्यान नेर्ली - तामगाव परिसरातून गो . शिरगावच्या दिशेने आल्याचे काही नागरीकांनी बघितले . सकाळी सातपासून परिसरात शोध सुरू होता . या सह गुरवकी व खापरे मळा या परिसरात दोन गवे असल्याची चर्चा घटनास्थळावर चर्चा होती .
    वन विभागाचे कर्मचारी , रेस्को टिम, गो . शिरगाव सरपंच , तरुण मंडळाचे सदस्य , कंदलगावचे उपसरपंच , पोलीस पाटील यांचे द्वारे उशिरापर्यत शोध मोहिम सुरु होती .

:घटनास्थळावर बघ्यांची गर्दी ..
      गावामध्ये तीन गवे शिरल्याची बातमी कानी पडताच गावातील तरूण , जेष्ठांनी मोठी गर्दी केली होती . शेतामध्ये काम करणारे मजूर , महिलाना शेतात काम न करण्याचा सल्ला देऊन गर्दिमुळे गवा बिथरला तर अनर्थ घडण्याची शक्यता असल्याने गर्दी पांगविणे गरजेचे होते . 

 सतर्कतेचा इशारा ...
     वन्य प्राणी बेधडक असल्याने लोकांची वर्दळ किंवा गर्दी झाल्यास ते सैर होतात . त्यामुळे शिवारामध्ये मजूरी करणारे शेतकरी , नागरीकांनी विनाकारण गर्दी न करण्याचा इशारा पोलीस व वन विभागाने दिला आहे .

फोटो  -  १ ) गो . शिरगाव म्हसोबा माळवाडी येथील सातबारा कॉलनी शेजारी घेतलेले गव्याचे छायाचित्र .२ ) परिसरात शोध मोहिम राबविताना वन विभागाचे अधिकारी .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )

No comments:

Post a Comment