Friday, 5 June 2020

कोल्हापूर परिस्थिती सुधारतेय 659 पैकी आजअखेर 419 रूग्णांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

कोल्हापूर,दि. 5 
: आजअखेर 659 रूग्णांपैकी 419 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत 131 प्राप्त अहवालापैकी 6 अहवाल पॉझीटिव्ह तर 125 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 23 3 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील यांनी आज दिली. 
आज रात्री 8 वाजेपर्यत प्राप्त 6 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा 4 व गडहिंग्लज- 2  असा समावेश आहे
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 63, भुदरगड- 67, चंदगड- 75, गडहिंग्लज- 69, गगनबावडा- 6, हातकणंगले- 6, कागल- 55, करवीर- 14, पन्हाळा- 25, राधानगरी- 63, शाहूवाडी- 169, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-21 असे एकूण 651 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1,  कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1  असे इतर जिल्हा व राज्यातील आठ असे मिळून एकूण 659 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. 
जिल्ह्यातील एकूण 659 रूग्णांपैकी 419 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 7 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 233 इतकी आहे.

No comments:

Post a Comment