उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
प्रत्येक वर्षी वृक्ष लागवड करण्यात येते पण फार कमी वृक्षाचे संगोपन पहायला मिळत आहे वृक्ष लागवड करून न थांबता त्यांचे संगोपन ही तितकेच म्हतवाचे आहे.जर वृक्ष संगोपन होत नसेल तर वृक्ष लागवड करण्याला महत्व नसते.आता लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे.तरी प्रत्येकानी एक घर एक झाड हे उपक्रम सुरू करावे व त्यांचे संगोपन ही करावे असे आवाहन ही त्यानी डोंगरशेळकी ता.उदगीर येथे गोपीनाथ मुंडे चौकात 5 जुन जागतीक पर्यावरण दिना निमित्ताने केले.प्रारंभी गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातले व
पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे चौकात वृक्ष लागवड करण्यात आले तर मा.नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्ष लागवड सामाजिक अंतर राखून करण्यात आली.
मा.नराध्यक्ष यांनी ही डोंगरशेळकी गावचे कौतुक केले गंडीपाटी ते डोंगरशेळकी पाच कि.मी.रोडच्या दुतर्फा बाजुने गत वर्षी करण्यात आलेली वृक्ष लागवडीचे संगोपन खुप छान झाले आहे आज ही वृक्ष या डोंगराळ भागात किती तरी निसर्गरम्य वातावर पहायाला मिळत आहे खरच या गावचा आदर्श घेऊन प्रत्येक गावात वृक्ष लागवड व संगोपन करावे असे ही ते बोलताना म्हणाले.
यावेळी त्यांच्या समवेत उदगीर चे माजी नगराध्यक्ष निटुरे,उपजिल्हा अधिकारी मंगशेट्टी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,प्रा.मुळे,प्रा.श्याम डावळे,पदमाकर उगीले,
जि.टी.मुंडे,सरपंच ज्ञानोबा मुंडे,उपसरपंच गणपत पवार,हणमंतराव हंडरगुळे,मारोती मुंडे,व्यंकटरा मरल्लापले,
अविनाश पुंड,राजपाल खंदाडे,मधुकर आपटे, यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment