Friday, 26 June 2020

सैनिक टाकळी परिसरात जोरदार पावसाने शेतकरी वर्ग आनंदित

सैनिक टाकळी प्रतिनिधी
सैनिक टाकळी व परिसरामध्ये मध्य रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह सुमारे दोन तास पाऊस पडत होता. गेल्या दोन दिवसांपासून हवेमध्ये भयंकर उष्णता जाणवत होती . यावर्षी या परिसरामध्ये वळवाचे दोन पाऊस पडल्याने ऊस पिके जोमाने डोलत आहेत . मान्सूनची सुरुवात यावर्षी लवकर झाल्याने शेतकरी वर्ग आनंदित होता पावसाने सुरुवात चांगली केल्याने शेतकऱ्याने भुईमूग  उडीद  यासारख्या पिकांना प्राधान्य दिले होते  परंतु अचानकच आठ दिवस उघडीप दिल्याने  ही पिके पावसाअभावी कोमेजू लागली होती परंतु काल पडलेल्या पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले आहे .याच बरोबर हवेतील उष्णता कमी झाली आहे. सध्या ऊस लागणीसाठी शेतकरी वर्गाची धांदल सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment