Thursday, 18 June 2020

जिल्हा ऊसतोड यंत्र मालक व वाहतूक संघटना अध्यक्षपदी सैनिक टाकळीचे उमेशचंद्र पाटील यांची निवड

कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा ऊसतोड यंत्र मालक व वाहतूक संघटना अध्यक्षपदी सैनिक टाकळी गावचे माजी सरपंच व विविध संस्थांचे पदाधिकारी ,कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव मा.उमेशचंद्र ह. पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्यातील उसतोड यंत्रमालक व वाहतूकदार यांच्या नृसिंह वाडी  येथे झालेल्या बैठकीत एकमताने निवड करणेत आली.
बैठकीच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य ऊसतोड यंत्रमालक व वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मा.युवराज पाटील होते .उमेशचंद्र पाटील यांचे नाव मा.उद्यजी संकपाळ यांनी सुचवले त्यास मा.परीटसर अ.लाट यांनी अनुमोदन दिले .या वेळी शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ऊसतोडणी यंत्र मालक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .

No comments:

Post a Comment