Monday, 15 June 2020

शेती बांधाचे वाद हे गावात मिटवा-स.पो.नि.बाळासाहेब नरवटे

उदगीर प्रतिनिधी गणेश मुंडे
आज गावामध्ये तंटामुक्ती च्या माध्यमातून अनेक चांगले कार्य होत आहेत अनेक दिवसांपासून शेत रस्ता, शेतीचे बांध फोडणे  किंवा अन्य गोष्टी चे किरकोळ वाद हे गावात या समितीच्या माध्यमातून मिटत असलेले आपण पहात आहात 
 शेतीचे वाद हे सुरू कसे होतात तर एकाने दुसरा शेजारी असलेल्या शेतकरी यांच्या बाबत काहीतरी चुकीचे सांगणे किंवा खोटी माहिती देऊन दोन गटात भांडणे लावणे.असे ते डोंगरशेळकी ता.उदगीर येथे
मा.पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधीक्षक लातूर व उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर यांच्या मार्गदर्शनाखाली वाढवणा पोलीस ठाणे अंतर्गत प्रत्येक गावात ग्राम भेटी दरम्यान ते मार्गदर्शन करत होते. 
यावेळी विश्वस्त व्यंकटराव मुंडे,तलाठी मोरे,उपनिरीक्षक संदीप जोंधळे,चेअरमन व्यंकटराव मरेवाड, पोलीस पाटील भालचंद्र शेळके,आदीसह सर्व बीट अंमलदार उपस्थित होते.पुढे बोलताना जो शेतकरी दुसरा व्यक्तीचे ऐकतो तो नक्की वादाच्या चक्रात अडकतो मग फुकट वेळ जातो पैसा जातो माणसीक तणाव वाढत जातो.शक्य तो असे न ऐकता जर खरोखर एखाद्या शेतकरी बाधवावर अन्याय होत असेल तर त्यांनी कायद्याची मदत घ्यावी व अस्या व्यकतीना न्याय हा मिळतो. गावातील वाद गावात जाऊन तसेच शेतीचे वाद बांधावर जाऊन मिटविण्यात येत आहेत त्यामुळे भविष्यात होणारा एखादा मोठा गुन्हा टाळला जाऊ शकतो.आज पर्यंत वाढवना हद्दीतील जवळ जवळ 40 गावांना वाढवना पोलिसानी भेटी दिल्या आहेत.यात वाढवना पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे व पोलिस उपनिरीक्षक संदीप जोधळे, व इतर सर्व बीट अंमलदार यांनी विविध गावांना भेटी देऊन गावातील वाद गावात च मिटविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.यावेळी गावातील शेतकरी बांधव सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.

No comments:

Post a Comment