नंदगाव प्रतिनिधी :
गिरगाव ( ता - करवीर ) येथे अनंत शांती आणी फिरंगोजी शिंदे संस्थेमार्फत वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरण हा मानवी जीवनाशी निगडित असा महत्त्वाचा घटक आहे. स्वच्छ पर्यावरण हे सदृढ आरोग्याचा पाया आहे. म्हणून स्वच्छ पर्यावरण ठेवणे प्रत्येक मानवाची जबाबदारी व काळाची गरज आहे. सध्या विज्ञानाच्या दृष्टीने वाटचाल करत असताना एकीकडे वृक्षतोड फार मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावुन जगविणे हि काळाची गरज आहे. या अनुषंगाने अनंतशांती संस्था व क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे संस्था यांचे वतीने गिरगांव येथे सरपंच संध्या पाटील, माजी उपसरपंच पांडुरंग खेडकर, पोलिस पाटील उमेश लोहार,माजी सैनिक सुभाष पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी अनंतशांतीचे अध्यक्ष भगवानराव गुरव,माधुरी खोत, फिरंगोजी शिंदे संस्थेचे वस्ताद प्रमोद पाटील, विश्वजीत पाटील, अजिंक्य जाधव, शितल चव्हाण, सानिका जाधव,लक्ष्मी पाटील, अभिजीत पाटील, चेतनकुमार पाटील, विराज सरनाईक, शिवराज पाटील यांच्यासह मर्दानी आखाड्याचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ - वृक्षारोपण करताना गिरगावच्या सरपंच सौ . संध्या पाटील व इतर मान्यवर .
No comments:
Post a Comment