Wednesday, 17 June 2020

एसटी पासधारकांना दिलासा - लॉकडाऊन काळातील पासची मुदत वाढवली - संभाजी ब्रिगेड च्या पाठपुराव्याला यश.


कोल्हापूर दि.17/06/2020 . 

लॉकडाऊन काळात प्रवासी वाहतूक बंद असल्याने जिल्ह्यातील हजारो एसटी प्रवाशांची पासची मुदत शिल्लक होती. सदर पास वर वाढीव मुदतीत प्रवास करण्याची सवलत मिळावी यासाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने सातत्याने निवेदन देऊन मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. संभाजी ब्रिगेड च्या राज्यभरातील पदाधिकारी यांनी सदर मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन दि .16  जुन रोजी राज्य परिवहन महामंडळाने अधिकृत पत्र काढून पासची मुदत वाढवून दिली आहे. तसेच ज्या पासधारकांना पुढील काळात प्रवास करायचा नाही त्यांना सदर पासवरील शिल्लक मुदतीची रक्कम परत देण्यात येणार आहे. यामुळे एसटी पासधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
जिल्ह्यातील कामगार ,विद्यार्थी आणि अन्य पासधारक प्रवाशांना या निर्णयाचा लाभ होणार असुन संबंधितांनी आग्रा प्रमुखांना भेटून नविन पास वर जुन्या पासचा क्रमांक नोंद करुन प्रवास करावा असे आवाहन संभाजी ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रुपेश पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment