उदगीर प्रतिनिधी -गणेश मुंडे
भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्रीय मंत्री मा. ना. नरेंद्र सिंग तोमर साहेब आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते मा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मंगळवार दि 23 जून 2020 रोजी सायंकाळी 6:30 वाजता वर्च्युअल रॅलीचे उदगीर मतदारसंघात यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या रॅली चे आयोजन उदगीर येथे गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ पॉलीटेकनिक कॉलेज कॅम्पस येथे भव्य दोन स्क्रीन
वर आयोजन करण्यात आलें.
या रॅली मध्ये उदगीर मतदार संघातील भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी आपल्या परिसरातील कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सोबतीने सहभाग घेतले.या रॅली मध्ये भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंद आण्णा केंद्रे,भाजपा मा. जिल्हा अध्यक्ष नागनाथ आण्णा निडवदे,भगवान दादा पाटील तळेगावकर,लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैय्या केंद्रे,महिला व बालकल्याण सभापती सौ. ज्योतीताई राठोड,भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, उदगीर पंचायत समिती सभापती विजयकुमार पाटील,राष्ट्रीय परिषद सदस्य प्रा. पंडित सूर्यवंशी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष बालाजी गवारे,उदगीर तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल निडवदे,ओबीसी तालुकाध्यक्ष आप्पाराव मुसने, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष इर्शाद शेख,जि. प. सदस्य शंकर रोडगे,जि.प.सदस्य विजयाताई बिरादार,माजी उपसभापती रामदास बेंबडे, पं. स. सदस्य उद्धव गंभीरे, पं. स. सदस्य नंदकुमार ब्याळे,पं.स.सदस्य मनोज गोंदेगावे,पं.स.सदस्य सुभाष कांबळे, पं.स.सदस्य रणजित कांबळे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव आपटे,भाजपा जिल्हा सरचिटणीस श्यामलाताई कारामुंगे,उत्तराताई कलबुर्गे, नगरसेवक शहाजी पाटील, नगरसेवक साईनाथ चिमेगावे, नगरसेवक रुपेश चव्हाण,नगरसेवक गणेश गायकवाड,नगरसेवक पप्पू गायकवाड,नगरसेवक डॉ.चंद्रकांत कोठारे,नगरसेवक नागेश आष्टुरे,नगरसेवक नामदेव आपटे, दिलीप मजगे,बबन दादा मुदाळे, राहुल अंबेसगे,सागर बिरादार,विशाल रंगवाळ,विकास जाधव,तालुक्यातील सर्व पक्ष पदाधिकारी,युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
या रॅली नंतर उपस्थित पदाधिकारी यांना गोविंद आण्णा केंद्रे, नागनाथ आण्णा निडवदे, भगवान दादा पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment