कोल्हापूर प्रतिनिधी
२०१९ मधे आलेल्या महापुरामधे जिल्ह्यातील अनेक गावात पाणी शिरल्याने अनेकांच्या घरांची पडझड झाली. वरणगे गावामध्ये देखील अनेक घरांमध्ये पाणी आले. घरांची अंशतः, पूर्णतः पडझड झाली. पिढ्यानपिढ्या ज्यांची घरे या क्षेत्रात आहेत. त्यांना या नैसर्गिक आपत्ती मुळे मोठे नुकसान झाले. असे असताना ग्रामपंचायत वरणगे यांनी दि.०४.०६.२०२० रोजी पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांना नोटीस देवून २०२० मधे पुर येण्याची शक्यता असून स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. सदर नोटीस अन्यायकारक असून नैसर्गिक आपत्तीमधे प्रशासनाने जनतेला आधार देणे गरजेचे होते.
लॉकडाउन मार्च २०२० पासून सुरु आहे. नोकरी व्यवसाय बंद असल्याने उदरनिर्वाह करणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत स्थलांतरित होणे कदापि शक्य नसल्याने प्रशासनानेच पर्यायी व्यवस्था निर्माण करून नागरिकांचे स्थलांतर करावे. गावातील गायराणांच्या जमिनीवरील अतिक्रमण काढावे हि प्रमुख मागणी ग्रामस्थांची आहे. गावठाण अथवा गायराणातील जमिनीवरील जागेमध्ये पूर बाधित नागरिकांचे स्थलांतर करावे. सदर ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील स्थलांतर, निवारा देण्याची सोय ताबडतोब करावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली.
मागणी निवेदन देताना शिवश्री राहुल पाटील. कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड करवीर, संतोष पाटील, अविनाश आंबी, प्रमोद पाटील, विकी पाटील, धोंडीराम पाटील आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment