Friday, 19 June 2020

शिवभोजन थाळीमुळे कोणीही गरीब उपाशी राहणार नाही : आम.ऋतुराज पाटील. गांधीनगर मध्ये शिव भोजन थाळी चा शुभारंभ


गांधिनगर ; प्रतिनिधी
श्रमिक व गोरगरीब नागरिकांच्या साठी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने  ५ रू मध्ये शिवभोजन थाळी दिली जाते.दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या श्रमिकांना शिवभोजन थाळी आधारवड आहे. गांधीनगर मध्ये अनेक श्रमिक अहोरात्र कष्ट करीत असून संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरिबांच्या कौतुकास पात्र असलेले शिवभोजन थाळी गांधिनगर सुरू होत आहे,असे मत आम.ऋतुराज पाटील यांनी केले.
 गांधीनगर - वळिवडे काॕर्नर येथील
हाॕटेल सैराट येथे शिवभोजन थाळीचा शुभारंभ कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज  पाटील 
यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी करवीरच्या तहसिलदार सौ.शितल मुळे-भांबरे यांची उपस्थिती होती.

 यावेळी पुरवठा अमलदार मा.श्री दत्ताञय पाडळकर, पुरवठा इन्स्पेक्टर श्री लक्ष्मिकांत पाटील ,मुडशिंगी सर्कल,मा.श्री सतिश चव्हाण , हाॕटेलच्या व्यवस्थापिका सौ.सारिका शेळके ,कृष्णात शेळके ,मा.श्री प्रदिप झांबरे माजी सभापती पं.स.करवीर ,मा.श्री विजय पाटील,को.दक्षिणचे ग्रामीण संपर्क प्रमुख श्री बजरंग रणदीवे,राजगोंडा वळिवडे , चंद्रकांत पाटील ,प्रल्हाद शिरोटे, गणपती जाधव बापू,डाॕ.अरविंद मोहीते,बाबा सरकार,राजेश तांबवे ,विकास घागरे,पो.पाटील दिपक पासान्ना, ग्रा.प.डे.सरपंच ,सर्व सदस्य व ना.बंटी प्रेमी ग्रुपचे व आर.पी.ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.
फोटो :गांधीनगर - वळिवडे काॕर्नर येथील
हाॕटेल सैराट येथे शिवभोजन थाळीचा शुभारंभ  आम. ऋतुराज  पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  करवीरच्या तहसिलदार सौ.शितल मुळे-भांबरे,प्रदीप झांबरे आदी. 

No comments:

Post a Comment