महाराष्ट्रातील धनगर व सर्व मेढंपाळ बांधवाना विनाअट बिनशर्थ महाराष्ट्रात कोणत्याही जिल्हात पशुधन मेंढरे शेळी यांना स्थलांतर करून चरण्यासाठी सर्व ठिकाणी शेतकरी अग्रीक्लचरल प्रमाणे परवानगी देण्यात यावी.अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली हाेती त्याप्रमाने आदेश महाराष्ट्राचे प्रधान सचिव .भूषण गगराणीसो विभागीय आयुक्त मा. दिपक म्हैसेकरसो यांनी तात्काळ सर्व जिल्हाधिकारी पोलिस महासंचालक, जिल्हापाेलिस प्रमुख , पशुसवर्धन सचिव प्रांताधिकारी ,तहसिलदार यांना देण्यात आले आहेत.
गेली अनेक दिवस झाले जिल्हातुन पर जिल्हात जाण्यास मेंढपाळना परवानगी नव्हती याबाबत धनगर शिष्टमंडळ हातकणंगले खासदार .धैर्यशिल माने यांना याबाबतीत निवेदन दिले असता खासदार माने यांनी तातडीने मुख्यमंत्रि उध्वजी ठाकरे यांना निवेदन देवुन पुन्हा प्रधान सचिव भूषण गगराणीसो व विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांचेशी सपर्क करून आदेश काढण्यासाठि प्रयत्न केले .यांचा लाभ महाराष्ट्रातील सर्व मेढंपाळ धनगर यांना झाला गेली तीन महिने झाले प्रत्येक जिल्हात धनगर मेढंपाळ अडकून बसले होते त्या मेंढपाळाना गावी येण्यास काेणतिहि अडचण येणार नाही . खासदार धैर्यशिल माने यांच्या प्रयत्नाने हा मोठा प्रश्न निकालात निघाला आहे.धनगर समाज बांधवातुन काैतुक हाेत आहे.यावेळी राजु आरगे संजय वाघमाेडे, राम कोळेकर ,प्रा.लक्ष्मण करपे,संभाजी गावडे, अनिल वळकुंजे, संभाजी शिनगारे ,जग्गनाथ माने, काशिनाथ शिनगारे सुनिल सलगर विकास घागरे मच्छिंद्र बनसाेडे उपस्थित हाेते.
No comments:
Post a Comment