उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
उदगीर तालुक्यातील हाळी या गावचे श्रीकांत तानाजी कांबळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत दिलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असुन त्यांची निवड तहसीलदार पदी झालेली आहे. हाळी तालुका उदगीर जिल्हा लातूर या गावचे भूमिपुत्र असून त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्यामुळे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सत्कार केला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या सोबत उदगीर पंचायत समितीचे माजी उपसभापती रामदास बेंबडे,भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अमर पवार,जिल्हा सचिव सागर बिरादार,विशाल रंगवाळ, बालाजी भोसले पाटील,दत्ता भोसले, श्रीधर स्वामी,बालाजी गुडेवार, संग्राम भोसले,रंगनाथ क्षीरसागर, महेश भोसले,राहुल कोरे,दत्ता भोसले,गणेश वाघमारे,संतोष क्षीरसागर,विकी भोसले आदींसह ग्रामस्थ सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.
No comments:
Post a Comment