Saturday, 6 June 2020

कंदलगाव येथे शिवराज्याभिषेक दिन आदर्शवत साजरा

...
कंदलगाव ता . ६ ,
     कंदलगाव येथील रायगड प्रेमी  ग्रुप व क्रिकेट प्रेमी यांचेकडून शिवराज्याभिषेक दिना निमित्य  वाडीच्या माळावरील मैदानावर वृक्षारोपन करण्यात आले .
       गेल्या पाच वर्षापासून रायगड प्रेमी ग्रुप कडून गावामध्ये तसेच परिसरात विधायक मोहिम राबवून आदर्श घ्यावा असा  शिवराज्याभिषेक  दिन साजरा केला जातो . या वर्षी कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन स्थिती असल्याने गाव परिसरात वृक्षारोपन करण्याचा निर्णय घेऊन वाडीच्या मैदानावर सुमारे ५१ राेपांची लागवड करण्यात आली . 
      यावेळी गावातील रायगड प्रेमी ग्रुप , क्रिकेट प्रेमी तसेच तरूण मंडळाचे सदस्य उपस्थित होते .
 कोट- छ . शिवरायांचा आदर्श व आदेशानुसार गावामध्ये वृक्षारोपण व पाणवठ्यांचे जतन करण्याच्या हेतूने हे वृक्षारोपन केले असून प्रत्येक वर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर करून गावामध्ये वृक्षसंपदा वाढविण्याचा मानस आहे .
आशिफ मुल्लाणी , प्रमोद पाटील 
सदस्य _ रायगड प्रेमी ग्रुप , कंदलगाव .
फोटो ओळ - कंदलगाव येथे शिवराज्याभिषेक दिना निमित्य वृक्षारोपन करताना रायगड प्रेमी ग्रुपचे सदस्य .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )

No comments:

Post a Comment