Thursday, 11 June 2020

दिव्यांगांसाठी ८ कोटी रुपयाचा निधी आणणारी लातूर जिल्हा परिषद महाराष्ट्रात पहिली - - सर्व साहित्य घरपोच देनार - - जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे

*
उदगीर प्रतिनिधी -गणेश मुंडे 
केंद्रसरकारच्या दिव्यांग व्यक्तींना कृञीम अवयव वाटप करण्यासाठी केंद्र सरकारकडुन ८ कोटी रुपयाचा निधी लातुरचे माजी पालकमंञी संभाजी पाटील निलंगेकर व लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी  खेचुन आणला.हा निधी वितरित करण्यासाठी लातुर जिल्हा परिषदेचे जिल्हापरिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सर्व बी.डी.ओ. सोबत बैठक आयोजित करुन जिल्हातिल प्रत्येक दिव्यांगाला घरपोच कृञीम अवयवाचे वाटप झाले पाहिजे आशा सुचना संबधित आधिकार्‍यांना दिल्या.  एक ही दिव्यांग या लाभापासुन वंचित राहणार नाही याच्या सुचना संबधित आधिकार्‍यांना दिल्या.केंद्रशासनाच्या दिव्यांग योजनेअंतर्गत भारतातिल  फक्त दोनच जिल्हयांना निधी मिळाला आसुन त्यातिल महाराष्ट्रातिल एकमेव लातुरजिल्हयाची निवड झाली तर दुसरा जिल्हा हा उत्तरप्रदेशातिल गोरखपुर  आहे  हा निधी मिळविण्यासाठी लातुरचे  माजी पालकमंञी संभाजी पाटील निलंगेकर व लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे याच्या प्रयत्नामूळेच हा ८ कोटी रुपयाचा निधी लातुरजिल्हयाला मिळाला आहे.
राज्यातिल एकमेव जिल्हा आहे की दिव्यांगाना कृञीम अवयव वाटपाचा निधी मिळण्याचा बहुमान लातुर जिल्हापरिषदेला माजी पालकमंञी संभाजी पाटील निलंगेकर व खासदार सुधाकर शृंगारे यांच्यामूळे मिळाला आहे आसे जिल्हापरिषद अध्यक्ष राहुल केंद्रे म्हनाले.जिल्हाभरातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव त्यांच्या घरपोच पुरवठा करण्यासाठीचे नियोजन करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.त्यावेळी बोलत होते.संवेदना अॅपच्या मध्यमातुन सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय भारत  सरकार, दिव्यांग जन सशक्तिकरण विभाग, भारत सरकार अंगीकृत अलिमको, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या वतीने 21 डिसेंबर 2019 ते 7 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये तालुकानिहाय दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव साहित्याचे वाटप करण्यासाठी शिबिर घेण्यात झाले होते. त्या शिबिरामध्ये पात्र असणाऱ्या 8797 दिव्यांग व्यक्तींना मोटार ट्रायसिकल,व्हीलचेअर,कुबड्या, कानाचे मशीन,काठी,वाकर इत्यादी साहित्य दिव्यांगांना घरपोच देण्यासाठीच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली या बैठकिला जिल्हयातिल  सर्व तालुक्याच्या गटविस्ताराधिकार्‍या  सोबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी चर्चा केली. वेळी या बैठकिला  जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ भारतबाई साळुंके, जिल्हा समाज कल्याण सभापती  रोहिदास वाघमारे,कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे,  जिल्हा समाजकल्याण अधिकारी खमितकर,जिल्हा शिक्षण अधिकारी जामदार मॅडम,संपूर्ण जिल्ह्यातील दहा तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment