जगावर कोरोना विषाणु चे संकट ओढवले असताना जगभरात सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. योग दिन हा एकात्मतेचा दिवस आहे हा दिवस गिरगाव ( ता- करवीर ) येथे सुरक्षित अंतर ठेवुन योगासने करित साजरा करण्यात आला योग केल्याने मुलांचे मानसिक शारिरीक आरोग्य आधिक सदृढ बनते शिवाय व्यसनापासुन मुक्त झालेल्या रुग्णाला शरीर व्यवस्थापना साठी मदत होते कोरोना हा विषाणू श्वसन संस्थेवर हल्ला चढवते तसेच व्यसनाधिन लोकांच्या हि प्रामुख्याने श्वसन संस्थे सह इतर इंद्रियामध्ये बिघाड करते यासाठी अनुलोम विनुलोम योगप्रणायम आहे योगामुळे मनुष्याला मानसिक शांती व सयंम सहनशक्ती मिळते भगवत गितेत योगःकर्मसु कौशलम म्हणजे च आपले कर्म कुशलतेने करने हाच योग आहे . योग आरोग्य दायी आयुष्याकडे घेवुन,जातो याच तत्वानुसार
फिरंगोजी शिंदे व अंनतशाती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्यामार्फत एक दिवसीय योग शिबिरमध्ये योग प्रशिक्षीका डॉ . नंदिनी गावडे , कदम. यांच्या उपस्थितीत योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. माधूरी खोत,भगवान गुरव , फिरंगोजी शिंदे संस्थेचे वस्ताद प्रमोद पाटील,सुभाष पाटील,विश्वजीत पाटील,शितल चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले.
No comments:
Post a Comment