Tuesday, 23 June 2020

वेंगुर्ले तालुक्यासाठी आरोग्यवर्धक ज्युस उपलब्ध : वाटपासाठी सरपंचांकडे सुपूर्द



कै.तातु सिताराम राणे ट्रस्ट तर्फे नारायणराव राणे कुटुंबियांचा उपक्रम


 वेंगुर्ले : प्रतिनिधी - दाजी नाईक

कै.तातु सिताराम राणे ट्रस्ट च्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री व खासदार नारायणराव राणे कुटुंबीयांकडून वेंगुर्ले तालुक्याला देण्यात आलेले आरोग्यवर्धक मल्टीव्हीट्यामीन ज्युस तालुक्यातील सरपंचांकडे गावामध्ये वाटण्यासाठी सुपूर्द करण्यात आले.
तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष राजन गिरप व जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते तालुक्यातील सरपंचांकडे देण्यात आले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर रोगप्रतीकारशक्ती वाढणेच्या हेतुने  ह्या आरोग्यवर्धक मल्टीव्हीट्यामीन ज्युसचा फायदा होणार आहे . दिनांक २३ जुन रोजी आम.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण वेंगुर्ले तालुक्यात व शहरात एकाचवेळी आरोग्य विभागातील कर्मचारी, संस्थात्मक विलगीकरणात असलेले चाकरमानी, पोलिस, आशा स्वयंसेवीका व मदतनीस, शिक्षक तसेच कोरोनाच्या लढ्यात प्रत्यक्ष लढणारे योद्धे या सर्वांना वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ता सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, सोशल मिडीया प्रमुख व परबवाडा सरपंच पपु परब, ता.चिटनीस समीर कुडाळकर व नितिन चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, नगरसेविका साक्षी पेडणेकर व पुनम जाधव, ता.उपाध्यक्ष व कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत, वजराठ सरपंच महेश राणे, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, पालचे कमलेश गावडे, आरवली बुथप्रमुख वेणु चिपकर, नवाबाग बुथप्रमुख प्रकाश मोटे, रुपेश राणे, होडावडा बुथप्रमुख प्रसाद परब, आनंद उर्फ बिट्टु गावडे, युवा मोर्चा जि. चिटनीस हेमंत गावडे, प्रकाश धावडे इत्यादी उपस्थित होते .

No comments:

Post a Comment