Monday, 8 June 2020

१५ जूनपासून विद्यार्थ्यांशिवाय शिक्षकवृंद शाळेत हजर राहणार. शैक्षणिक व्यासपीठ व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय .


हातकणंगले/ प्रतिनिधी

मिलींद बारवडे

      शैक्षणिक सत्र सुरू करणेबाबत निश्चित धोरण ठरविण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासमवेत शैक्षणिक व्यासपिठाची बैठक माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात जिल्हा परिषदेमध्ये आयोजित केली होती. यामध्ये १५जूनपासून विद्यार्थ्यांशिवाय शिक्षकवृंद शाळेत हजर राहतील, शासनाचा पुढील आदेश येई पर्यत विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास कोणीही सक्ती करू नये असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. स्वागत व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड यांनी केली.
       झालेल्या बैठकीमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांनी चालू शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे.विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप आपल्या सोयीनुसार शालेयस्तरावर करावे.क्वारंटाईनसाठी ज्या शाळा प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत त्या शाळा निर्जंतुकीकरण करून आपल्या ताब्यात दिल्याशिवाय व शासनाचा आदेश मिळाल्याशिवाय त्यांचा वापर करू नये . कोविड १९ कामासाठी सेवा बजावणाऱ्या शिक्षक कर्तव्यातून मुक्त झाले नंतर त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन झाले नंतर शाळेत उपस्थित राहावयास सांगावे. कोविड १९ सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना त्यांची त्या सेवेतून मुक्तता झाले शिवाय शाळेत येण्याची सक्ती करू नये.तसेच या सेवेबदलात आर्जित रजा मिळाव्यात याबद्दल चर्चा झाली.
        याच बरोबर शाळांचे वेतनेत्तर अनुदान संदर्भात चर्चा करण्यात आली. हे वेतनेत्तर अनुदान बीडीएसच्या अभावी परत गेल्याचे शिक्षणाधिकारी लोहार यांनी सांगितले. हे अनुदान परत मिळविण्यासाठी पालकमंत्री नाम. सतेज पाटील यांची भेट घेण्याचे ठरले. चालू शैक्षणिक वर्षाच्या सुट्टयांच्या बाबत शासनाच्या आदेशानंतर कळविले जाईल.
आशा मुद्दयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
     या शिष्टमंडळात व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड, प्रा. जयंत आसगावकर, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील ,खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील,सुधाकर निर्मळे, उदय पाटील, मिलींद पांगिरेकर, राजेश वरक, मिलींद बारवडे, अशोक हुबळे, रविंद्र मोरे, गजानन काटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते .आभार दत्ता पाटील यांनी मानले.

        फोटो 
माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना निवेदन देतांना व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड व इतर मान्यवर.

No comments:

Post a Comment