Sunday, 7 June 2020

अखेर श्रमदानातून केला आशिष फुके यांनी रस्ता

प्रतिनिधि - आरिफ़ पोपटे
कारंजा लाड :- स्थानिक आमदार कार्यालया मागे असलेल्या कीर्ती नगर येथील रस्ताचि दुरुस्ती होत नसल्यामुळे पावसाळ्यात, येथून आवागमन करणे कठीण होते. तसेच येथून टू व्हिलर फोर व्हिलर  गाड्या काढणे तर सोडाच परन्तु माणसाला चालणे सुधा कठीण होत आहे. नगर परिषद हे परस्पर पणे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अखेर कीर्ती नगर कॉलनीतील  आशिष फुके यांनी स्वखर्चाने 200 फुट हम्मरस्ता तयार करून घेतला व कॉलनी वासियांची व्यवस्था केली, सदर कामाकरिता कामाचा ठेका कोळी येथील ठेकेदार मोहसीन व नईमोदीन अ. नवी या मिस्त्रीनी वाजवी दरात काम करून दिले या समाजोपयोगी कार्याबद्दल कॉलनी तील डॉ गजानन गावंडे, प्रोफेसर ताकतोडे सर, दीक्षित सर, प्रशांत इंगोले सर, जाधव सर, मोर सर, सौ. छाया गावंडे, सौ. रजनी ताकतोडे, रोकडे  काका ई. नी आशिष फुके यांचे अभिनंदन केले असून स्वतः श्रमदान करणार्‍या व स्वखर्चाने हमरस्ता  करणार्‍या आशिष फुके यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment