रजनिकांत वानखडे
वाशिम प्रतिनिधी
महाबीज बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पहिलेच शेतकरी दुष्काळ यामुळे अडचणीत आणि आता त्यात महाबीज सोयाबीन मुळे शेतकऱ्यांना डबल पेरणी करावी लागत आहे. महाबीज बियाणे 70 टक्के निघालेच नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कृषी विभागाने तात्काळ कारवाई करावी. शेतकऱ्याला ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा आज फक्त प्रहार संघटनेतर्फे काळे फासण्यात आले दोन-चार दिवसात प्रहार स्टाईलने उग्र आंदोलन सर्व शेतकरी मिशी करू लाँकडॉउन चा कोणताही नियम आम्ही यानंतर पाळणार नाही. जर शासनाने महाबीज अंकुर रोहित सीड्स या कंपनीवर कारवाई केली नाही तर आंदोलन उभं करून त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन व कृषी विभाग जबाबदार राहील.
यावेळी वाशिम जिल्हाध्यक्ष सागर सोलव वाशिम जिल्हा संघटक विजय शेंडगे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे मंगेश घुगे रवी घुगे इत्यादी कार्यकर्ते हजर होते.
No comments:
Post a Comment