Saturday, 13 June 2020

ऑनलाईन स्पर्धांच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देणार - सौ.प्रतिमा पाटील


कोल्हापूर प्रतिनिधी -
    


महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते .म्हणूनच आपण महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवत आहोत.कोरोनाचे संकट लक्षात घेता ऑनलाईन स्पर्धांच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देणार आहे, असे प्रतिपादन सौ प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा सौ प्रतिमा सतेज पाटील यांनी केले.सोशल वेल्फेअरच्यावतीने आयोजित विविध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या.यावेळी सौ.प्रतिमा पाटील आणि  आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आली.

  सौ प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरच्यावतीने महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तसेच वटपौर्णिमेनिमित महिलासाठी ऑनलाईन विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. सोशल डिस्टनसिंगच पालन करत पार पडलेल्या या कार्यक्रमात बोलताना सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा सौ प्रतिमा सतेज पाटील यांनी सांगितले की, महिलांमध्ये कला ,गुण,टॅलेंट आहेत . आपण महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी  ऑनलाईन स्पर्धा हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.भविष्यात ही ऑनलाईन स्पर्धा तसेच विविध उपक्रम घेणार आहे.
   या कार्यक्रमात बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी सोशल वेल्फेअरच्या कार्याचे आणि महिलांचे कौतुक केले.तसेच कोरोना विरुद्धच्या लढाईत लढताना आपण जे टीमवर्क केले असेच यापुढेही टीमवर्क करून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील राहूया असे आवाहन केले.
       यावेळी 8 मार्चला सोशल वेलअरच्यावतींने आयोजित रॅलीमध्ये विजेत्या ठरलेल्या महिला गटातील लगोरी ग्रुप,चाचा नेहरू बालबचपन ग्रुप,आपली माती आपली माणस या ग्रुपला अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.तर युगंधरा ग्रुप आणि एकटी संस्थेला उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरवण्यात आले. युवती रॅली स्पर्धेतील वसंतराव देशमुख हायस्कुल,रुतूरंग ग्रुप,विवेकानंद कॉलेजच्या विध्यार्थीनीना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.तर डॉ डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा आणि न्यू पॅलेस स्कुलच्या विधार्थिनींना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.     

 सोशल मिडियावर आजची वटसावित्री या विषयावर व्हिडिओ ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या साळोखेनगर इथल्या धनश्री बोटे,कसबा बावडा, सारिका पाटील,शाहूपुरी, राधिका कवठेकर या विजेत्या स्पर्धकांना आणि या स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षीस  विजेत्या गांधीनगर इथल्या शिवानी यादव यांनाही गौरवण्यात आले .कोलाज फोटो फ्रेम स्पर्धेतील निलिशा सामंत,मेघा बाभोंरीकर,रुपाली जांभळे,संध्या पिंपळगावकर यांनाही रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.महिला दिनानिमित्त आपल्या पोवाड्यातून महिलांमध्ये जनजागृती करणाऱ्या दीप्ती सावंत या युवतीचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवानी यादव यांनी नामदार सतेज पाटील आणि सौ प्रतिमा पाटील तसेच डॉ डी वाय पाटील ग्रुपच्या कार्याचा आढावा घेतला.
प्रास्ताविक आणि  सुत्रसंचालन प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी केले.

No comments:

Post a Comment