उदगीर प्रतिनिधी :-गणेश मुंडे
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा क्रमांक 3 चे संपूर्ण लातूर जिल्हा भरातील प्रस्ताव युद्ध पातळीवर तयार करून केंद्र सरकारकडे सादर करत आहोत अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली.केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम *प्रधानमंत्री ग्राम सडक योजना* याची लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात कमीत कमी दोनशे किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले असून त्या प्रस्तावाची पाहणी लातूर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी टीम सोबत चर्चा करून केली तसेच आपल्या स्वाक्षरीने सदरील प्रस्तावित रस्त्यांची कामेही केंद्र सरकारकडे प्रस्तावित करत आहोत अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे यावेळी PMJSY चे इंजिनिअर श्री खमितकर, गुरमे आदींसह टीम उपस्थित होती.
No comments:
Post a Comment