कोल्हापूर / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
प्राथमिक, माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळांचे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निर्जंतुकीकरण कराव्यात व कोरोना संसर्ग फैलाव रोखण्यासाठी शिक्षकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून सर्वें करणेसह विविध सेवा बजावल्या बाबत त्यांच्या सेवा पुस्तकेत नोंद होऊन अर्जीत रजा मंजूर करण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय व्हावा अशा मागणीचे लेखी निवेदन स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना देण्यात आले. निवेदन नायब तहसिलदार अनंत गुरव यांनी स्विकारले.
निवेदनातील आशय असा की मार्च महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी उपाय केले जात आहेत. गावा - गावात , तालुकास्तरावर, जिल्हा आदींच्या सीमाबंध करून उपाय योजना केल्या गेल्या. बाहेरील देशातून ,राज्यातून जिल्हयातून आलेल्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून चौदा दिवस क्वारंटाईन करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचा संस्थात्मक वस्तीगृहासाठी वापर करण्यात आला. त्यामुळे कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास शासन स्तरावरून झालेल्या उत्कृष्ठ नियोजनाच्या उपाययोजनेस यश मिळाले आहे.
येत्या काही दिवसानंतर शाळा टप्या -टप्याने सुरू करण्याचा विचार शासनस्तरावरून होत आहे. शाळा सुरू करण्यासाठी इमारतीचे निर्जंतुकीकरण होणे विदयार्थी शिक्षकवृंद यांच्या जीविताच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांनी शाळांच्या इमारती पूर्णता: निर्जंतुकीकरण कराव्यात अशी विनंती करीत आहोत.
कोरोना विषाणू संसर्ग फैलाव रोखण्यासाठी खबरदारी उपाय म्हणून गाव, नगरपंचायत , नगरपालिका, नगरपरिषद ,महानगरपालिका आदी क्षेत्रात मार्च, एप्रिल, मे, जून या चार महिन्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून विविध वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी सर्वे करणे, गाव ,तालुका ,जिल्हा सिमाबंद ठिकाणी वाहतूकीसंदर्भात सेवा बजावणे व अन्य सेवेसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून ड्युटी करण्याचे आदेश मिळाल्याने त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्य म्हणून सेवा बजावली आहे. या त्यांच्या उत्कृष्ठ सेवेची दखल घेऊन त्यांच्या सेवा पुस्तकेत या सेवेची नोंद होण्यासंदर्भात व त्यांनी या काळातील बजावलेल्या सेवेबद्दल अर्जित रजा मंजूर करण्याच्या संदर्भात शासन दरबारी सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा . अशी स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने विनंती करीत आहोत.
निवेदनाच्या प्रती शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे,माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार, प्राथमिक शिक्षण अधिकारी यांचे निवेदन उपशिक्षणाधिकारी बी एम कासार यांना देण्यात आली.
या वेळी स्वाभिमानी शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे,शिक्षक नेते प्रा. भास्कर चंदनशिवे, मुख्याध्यापक राजेंद्र माने, अभिजीत गायकवाड, माध्य.जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे उच्च - माध्य. जिल्हाध्यक्ष प्रा. प्रविण देसाई सरचिटणीस भाऊसाहेब सकट , कार्याध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील,
सुरेश कांबरे, फुलसिंग जाधव, नंदकुमार कांबळे , अॅन्थनी डिसोजा , राकेश चव्हाण, पांडुरंग पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो - स्वाभिमानी शिक्षक संघाचे लेखी निवेदन संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे नायब तहसिलदार अनंत गुरव यांना देतांना शेजारी शिक्षक नेते प्रा. भास्कर चंदनशिवे मुख्याध्यापक राजेंद्र माने आदी.
No comments:
Post a Comment