Monday, 6 July 2020

मुंबई नागपूर हवेवर सोनाळा फाट्यावर ट्रकचा अपघात - जीवित हानी टळली


प्रतिनिधी रजनिकांत वानखडे 
 मुंबई-नागपूर महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात येत असलेल्या  सोनाळा फाट्याजवळ नाशिक वरून नागपूरला जात असलेला mh15 सीके 58 88 या नंबरचा ट्रक अपघात झाला असून ड्रायव्हर व क्लीनर भाग्यवान असून या अपघातात त्यांना किरकोळ जखम झालेल्या असून त्यामुळे जीवित हानी टळली
 नाशिक वरून नागपूरला दारू घेऊन जात असताना वाशिम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात येत असलेल्या सोनाळा फाट्याजवळ ड्रायव्हरच्या नियंत्रण सुटल्याने ट्रकने सदर रोडच्या कडेला पलटी घेतली व त्यामध्ये क्लीनर ड्रायव्हर यांना किरकोळ जखम व मुक्का मार लागला परंतु एवढा मोठा अपघात झाल्यावर सुद्धा ड्रायव्हर आणि क्लीनर मोठे दैव घेऊन असल्यामुळे त्यांना किरकोळ जखमा व मुकामार लागला. 


No comments:

Post a Comment