Wednesday, 8 July 2020

राजापूर बंधारा पुन्हा पाण्याखाली

सैनिक टाकळी प्रतिनिधी

 राजापूर तालुका शिरोळ येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दुसऱ्यादां पाण्याखाली गेला आहे . गेल्या दोन दिवसापासून धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाल्याने वारणा, पंचगंगा ,कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये वाढ होत आहे. यावर्षी पावसाळा वेळेत सुरू झाल्याने जून महिन्यापासून नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे . या बंधाऱ्यातून  सकाळी आठ वाजता ३६८५०  क्युसेसचा विसर्ग सुरू होता. नदीच्या पात्रात पाणी वाढत असल्याने विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकरी वर्गाची धांदल उडाली आहे.  तालुक्यामध्ये सध्या शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे . यामध्ये भुईमुगाचे क्षेत्र वाढले आहे गतवर्षीच्या महापुरामुळे या वर्षी नगदी पिकाकडे लोकांचा कल दिसून येत आहे. या भागामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी अधुनमधून तुरळक सरी कोसळत आहेत. या पावसाचा फायदा सर्वच  पिकांना होत असल्याने पिके जोमाने डोलू लागली आहेत ..

No comments:

Post a Comment