गिरगाव येथील फिरंगोजी शिंदे संस्था व अनंतशांती संस्था यांचे मार्फत जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधुन २०२० वृक्ष लागवड करण्यात आली. संपूर्ण जगभरात लोकसंख्या भयानक वाढत आहे या लोकसंख्या वाढीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.
ग्रामीण भागाचे शहरीकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. सर्व जैविक विविधता व पर्यावरणाचा समतोल स्थिरावण्यासाठी आपले पर्यावरण स्थिरावणे हि सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी काळाची गरज आहे. यासाठी एक व्यक्ती एक वृक्ष या संकल्पनेने व पर्यावरणाचे समतोल राखणे,आपली जैवविविधता संगोपन करणे याचा आढावा घेवुन अनंतशांती व फिरंगोजी शिंदे या संस्थे मार्फत गिरगांव क्रिडांगण सह इतर भागात एकुण २०२० साली २०२० वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवुन वृक्षारोपन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गिरगाव संरपच सौ. संध्या पाटिल या होत्या. तसेच फिरंगोजी शिंदे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद प्रमोद पाटिल,अनंतशांतीचे संस्थापक भगवान गुरव, सचिव अरुणा पाटील, पोलिस पाटील उमेश लोहार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अनंतशातीच्या अध्यक्ष माधुरी खोत यांनी लोकसंख्या वाढिचे दुष्परिणाम व पर्यावरण समतोल याविषयी माहिती दिले.
यावेळी माजी सैनिक सुभाष पाटील, प्रकाश पाटील, अजिंक्य जाधव,स्वप्निल पाटील,काजल पाटील,लक्ष्मी पाटील,सानिका जाधव,सानिका पाटील,स्वरांजली पाटील, कस्तुरी पाटील,श्रेया शिंदे,ऋतुजा पाटील,वैष्णवी सरनाईक यांचे सह ग्राम पंचायतचे विशेष सहकार्य लाभले.
फोटो - गिरगाव येथे वृक्षारोपन करताना संस्थेचे सदस्य व इतर मान्यवर .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )
No comments:
Post a Comment