Tuesday, 7 July 2020

ज्येष्ठ छायाचित्रकार रामभाऊ पाटील स्मरणार्थ वृक्ष व मास्क वाटप

नंदुरबार  -  ( प्रतिनिधी - वैभव करवंदकर  ) : --------*                    
  ज्येष्ठ छायाचित्रकार कै. रामभाऊ जगन पाटील यांचा स्मृतिदिनानिमित्त श्रीरामभाऊ पाटील स्मृती प्रतिष्ठान तर्फे वृक्ष व मास्क वाटप करण्यात आले. 
        पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून  वृक्ष  वाटप तसेच कोरोना आजारा  पासून संरक्षण करता यावे.  यासाठी मास्क  वाटप करण्यात आले . शहरातील नवीन वसाहत असलेल्या आनंद नगर व अजय नगर येथे सदर कार्यक्रम सोशल डिस्टन्स ठेवून घेण्यात आला.  दोन्ही कॉलनी चे  रहिवासी  कार्यक्रमाला उपस्थित होते.   साध्या पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आला. यात विविध प्रकारचे झाडे वाटप करण्यात आले.       
           यावेळी भागवताचार्य हेमंत पाठक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पाटील , शैलेश शिंपी, विजय सोनार, हिरालाल मराठे, ग्रामसेवक जितेंद्र वळवी ,पंकज   साळी ,मनोज मिश्रा, श्री क्षिरसागर, प्रवीण चव्हाण, स्वप्निल तांबोळी, भूषण पाठक , हितेश पाठक ,प्रकाश पाटील , बाबा शंकपाळ आदी उपस्थित होते. 
      श्री रामभाऊ पाटील स्मृती प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम राबविण्यात येतात.  त्यात सामाजिक सांस्कृतिक व फोटो प्रदर्शन संस्थेमार्फत विविध कार्यक्रम घेतले जात असतात.

No comments:

Post a Comment