Wednesday, 15 July 2020

कर्मचारी वैद्यकीय बिलाबाबत शासनाकडे पाठपुरावा करु - ना. राजेंद्र पाटील यड्रावकर

हातकणंगले / प्रतिनिधी
मिलींद बारवडे     
              सन २०१८ - १९ व २०१९ - २० या आर्थिक वर्षातील शासकीय -निमशासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले कोरोनाच्या काळात सरसकट मंजूर करावीत . यासह अन्य मागण्यांचे निवेदन आरोग्यमंत्री नाम . राजेंद्र पाटील  यड्रावकर  यांना शिक्षक भारती संघटनेचे पुणे विभागाचे अध्यक्ष व शिक्षकनेते  दादासाहेब लाड ,पगारदार पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर पाटील , अध्यक्ष  सुनिल पाटील यांनी दिले .
          यावेळी  पांढऱ्या रेशनकार्ड धारकांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत केलेबद्दल नाम . पाटील यांचे आभार मानले . नाम . पाटील यांनी शासन दरबारी वैद्यकीय बिलाबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले .

         फोटो - 
नाम . राजेंद्र पाटील -यड्रावकर यांना निवेदन देताना शिक्षकनेते  दादासाहेब लाड  मनोहर पाटील , सुनिल पाटील .....

No comments:

Post a Comment