Wednesday, 22 July 2020

वृक्षारोपना बरोबर संवर्धनही महत्वाचे... शिवाजी रणदिवे माजी सरपंच, कंदलगाव.

कंदलगाव - प्रकाश पाटील

    कंदलगाव येथील स्मशान भूमीमध्ये अनेकदा वृक्षारोपन करण्यात आले. पण त्या रोपांचे संवर्धन झाले नसल्याने पुन्हा -पुन्हा त्याच खड्डयात वृक्षारोपन केल्याच्या घटना घडत होत्या.
   मात्र दक्षता समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक पुंदिकर यांनी सन २०१२पासून वृक्ष लागवडी बरोबर संवर्धनाला महत्व देऊन दिवसातील आपले काम सांभाळून परिसरातील लागवड केलेल्या सर्व रोपट्यांसाठी किमान तीन तासाचा वेळ देऊन त्यांच्या संगोपनाला महत्व देतात.
    देशी वृक्षांवर त्यांचे जास्त प्रेम असल्याने त्यांनी लागवड केलेल्या वृक्षांमध्ये वड, पिंपळ,कडूलिंब,चिंच,जांभूळ, आपटा या वृक्षांची निवड केली आहे . त्यांच्या मते हे वृक्षांचे आयुष्य जास्त आहे तसेच ऑक्सीजन हि जास्त देतात .
    सध्या पुंदिकर हे आपला सर्वात जास्त वृक्षसंवर्धनाला देत असून गावातील सर्वच ठिकाणी केलेल्या वृक्षांची काळजी घेण्यासाठी त्यांना विलास कांबळे, अनिल सुतार, उत्तम पाटील, संतोष निर्मळ, अमित चव्हाण, डॉ.मोहन शिर्के, मनोहर लोहार, सचिन संकपाक यांची साथ लाभली आहे.


  - संवर्धनासाठी रविवार ..

      रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी वृक्षसंवर्धनासाठी किमान तीन तास वेळ देता येतो या हेतूने रविवार निवडला असून गावातील नव्याने केलेल्या वृक्षारोपना बरोबर अगदी जुन्या वृक्षांचीही काळजी घेतली जाते. यामध्ये वृक्षांना लागलेली वाळवी काढणे, पाणी देणे, औषध फवारणी, ग्राम स्वच्छता, पाणी परिक्षण या सारखी कामे केली जातात.


फोटो  - कंदलगाव येथील वृक्ष लागवडीचे संवर्धन करताना अशोक पुंदिकर, सचिन संकपाळ, उत्तम पाटील, संतोष निर्मळ, प्रमोद खोत, कुमार पाटील इ .

No comments:

Post a Comment