Friday, 3 July 2020

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयास विविध मागण्यांचे निवेदन सादर.

प्रतिनिधी:  
शिक्षक भारती संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालय तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना शिक्षक भारती संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड, जिल्हा अध्यक्ष काकासाहेब भोकरे  यांनी सादर केले . कोल्हापूर विभागाचे शिक्षण सहसंचालक सुभाष चौगले यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातील मागण्यांमध्ये प्रामुख्याने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात टेलिव्हिजन व रेडिओद्वारे ऑनलाइन शिक्षण शासनाने सुरू करावे, ऑनलाईन शिक्षणासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांचे प्रशिक्षण घ्यावे , विद्यार्थ्यांना टॅबलेट व  अँड्रॉइड फोनची साधने शासनाने उपलब्ध करावीत, ड्युटीवरील शिक्षक-शिक्षकेतर यांना  कोरोनाची लागण झाल्यास उपचाराचा खर्च तातडीने द्यावा तसेच कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पन्नास लाख रुपये  मदत द्यावी ,विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कोविड ड्युटीतून शिक्षकांना कार्यमुक्त करावे, कोवीड ड्युटीवरील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता मिळावा, शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर न सोपविता याची जबाबदारी शासनाने घ्यावी, शाळा सुरू करण्यापूर्वी थर्मल स्कॅनिंग मशीन व हॅन्ड ग्लोज आदी साहित्यासाठी शाळेला विशेष अनुदान मिळावे, स्थलांतरित  गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना  नजीकच्या शाळेत विनाअट प्रवेश मिळावा , कोरोना काळात  शिक्षक-शिक्षकेतर यांचे  पगार कपात करू नये, शाळा सुरू  होईपर्यंत  शिक्षकांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक असू नये आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश होता.  या निवेदनाचा सकारात्मक विचार करून  तात्काळ आपल्या मागण्या शासनाकडे पाठविल्या जातील असे शिक्षण  सहाय्यक संचालक सुभाष चौगले यांनी सांगितले. वरील मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनाही देण्यात आले . याप्रसंगी  शिक्षक भारती पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड , कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष काकासाहेब भोकरे , उपाध्यक्ष बाळ  डेळेकर , सचिव अनिल चव्हाण, संघटक अशोक मानकर  तसेच कोजिमाशि पतसंस्था चेअरमन कैलास सुतार , संचालक  अरविंद किल्लेदार,  सचिन पाटील,  एकनाथ कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment