कंदलगाव - प्रकाश पाटील
आपल्या सोबत नसणाऱ्या किंवा आपल्यातून निघून गेलेल्या प्रिय व्यक्तींच्या आठवणी आपल्या आयुष्यात जपून ठेवण्यासाठी त्यांच्या अनेक वस्तू आपण जतन करून ठेवतो. मग एखादे खेळण असो वा त्याला आवणारे पदार्थ असो आपण ते जतन करून ठेवतो.असेच पतीच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी कंदलगाव शेजारील केएमटी कॉलनीमधील कांचन घोटणे यांनी त्यांचे पती रमेश घोटणे यांनी लावलेल्या वृक्षांचे त्यांच्या पश्चात संगोपन करून दारासमोरील अंगणात अनेक वृक्ष वाढविले आहेत. दिवसातील कित्येक तास त्या या वृक्षवल्लीचा सानिध्यात घालवितात. आपल्या आईचे बाबांवरील प्रेम अबाधीत होऊ नये यासाठी त्यांना मुलगा,सुन ,नातवंडे यांची साथ मिळत आहे.
आपल्या घरातील व्यक्तीच्या पश्चात कोण चहा वर तर कोणत्यांना आवडणाऱ्या वस्तू जतन करून आपले प्रेम, आठवणी जागृत ठेवतात. आशाच प्रकारच्या आठवणी घोटणे यांनी आपल्या दारासमोरील वृक्षांत साठवून ठेवल्या आहेत. दररोज त्यांना पाणी घालणे, त्यांचे संगोपन करणे इतकेच नव्हे तर त्यांच्याशी संवाद ही साधून आपले दुःख कमी करतात. त्यांच्या अंगणातील पेरूचे झाड असो वा एखादा वेल त्यांच्यासाठी कुठूंबातील एक सदस्यच असल्याचे त्या सांगतात .
त्यांचे पती रमेश घोटणे यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले त्यांनी दारासमोरील अंगणात लावलेले नारळीचे रोप त्यांची आठवण म्हणून डोक्यावरून घागरीने पाणी घालून त्याला मोठे केले आणि आपल्या पतीच्या स्मृती जिंवत ठेवण्याचा निश्चय केला. तेव्हांपासून अंगणातीलच नव्हे तर रस्त्यावरच्याही वृक्षवेलींवर तितकेच प्रेम बसून राहिले आहे.
घरासमोरील छोट्याशा अंगणात नारळ, पेरू, आंबा या सह भाजीपाला, फुलांची झाडे पतीच्या आठवणी म्हणून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या सानिध्यात दिवस कसा जातो कळत नाही. अंगणातील प्रत्येक रोपात आपली व्यक्ति आपल्या सोबत असल्याचा भास होतो. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कोट - आपल्या सोबत असलेल्या व्यक्तिपेक्षा सोबत नसलेल्यांची फार आठवण येते. माझ्या पतींचे वृक्षांवर प्रेम होते. त्यांच्या आठवणी वृक्ष संगोपनातून जिंवत ठेवत आहे .
कांचन घोटणे .
फोटो -. कांचन घोटणे आपल्या नातवंडा सोबत परस बागेत .
( छायाचित्र . प्रकाश पाटील )
वा काय ताई आहेत.त्याना उदंड आयुष्य लाभू दे.
ReplyDelete