Sunday, 19 July 2020

लॉकडाऊन काळात सुद्धा युवकांना संधी उपलब्ध होऊ शकतात - डॉ . ज्ञानेश्वर मुळे


हातकणंगले / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
         पुस्तकी किडा न होता सामाजिक कामात सहभाग नोंदवून जनसंपर्क वाढवावा . सध्या कोरोनाने घरी बसवुन युवकांना शेकडो संधी उपलब्ध करून दिल्या आहेत . जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकविले आहे . आता पर्यावरणाशी एकरूप होऊन संवाद साधायला शिकले पाहिजे . कल्पकतेचा व चौकस बुद्धीचा वापर करा . येथून पुढे जग याहीपेक्षा आव्हानात्मक असणार आहे . त्यासाठी स्वतःचे फाउंडेशन घट्ट असले पाहिजे . असे मार्गदर्शन पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे डॉ . ज्ञानेश्वर मुळे यांनी केले
        ते संजय घोडावत पॉलीटेक्निक आयोजित ऑनलाइन वेबिनारमध्ये संवाद साधताना बोलत होते . डॉ. मुळे हे  पासपोर्ट विजा अॅन्ड ओवरसिस इंडियन अफेअर्स चे माजी सेक्रेटरी होते . सध्या ते दिल्ली येथे मेंबर ऑफ नॅशनल ह्यूमन कमिशनमध्ये सेवा बजावत आहेत .
      डॉ . मुळे यांनी सांगितले , पस्तीस वर्षाच्या अनुभवांमध्ये काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या . माणसाचे एकाच वेळी अनेक प्रवास सुरू असतात . मी शाहू-फुले-आंबेडकर अशा कोल्हापूर जिल्ह्यात शिकलो असून त्यावेळी मुंबई दिल्लीत जाणे म्हणजे क्रांती होती . पैसे नसताना एमपीएससी व यूपीएससी करता येते . परदेशात गेल्यामुळे साम्यवादी ,भांडवलशाही व्यवस्थेसह अनेक वेगवेगळ्या भाषेची व व्यवस्थेची माहिती मिळाली . तरी गाव भाषा सोडली की आपण स्वावलंबी असतो . त्याचबरोबर त्याग व सेवा असल्याशिवाय देशसेवा होऊ होऊ शकत नाही . असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला .        
         यावेळी इन्कम टॅक्स विभागाच्या मुख्य आयुक्त  साधना शंकर यांनी सांगितले , कोवीडच्या महामारी काळात देशाची आर्थिक परिस्थिती दुर्बल झाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी फक्त शेतकरीवर्ग पार पाडू शकतो. करियर निवडताना दोन प्लॅन असावेत . पहिल्या प्लॅनमध्ये लक्ष केंद्रित करून सध्या जे शिकत आहात त्यात यशस्वी व्हावे . तर दुसऱ्या प्लॅनमध्ये शिकलेल्या शिक्षणाची प्रेरणा घेऊन संधी शोधावी .      
         आयएफएस  पुजा प्रियदर्शनी म्हणाल्या , स्पर्धा परीक्षा ही परीक्षा नसून एक ध्येय निश्चितीचे साधन आहे . पालकांनी पाल्याचा कल पाहून त्यांना शिक्षणात स्वतंत्र संधी दिली पाहिजे . स्पर्धा परीक्षा कठीण वाटली तरी तुम्ही आयुष्याची ध्येयनिश्चिती ठरविली तर यशस्वी होऊ शकता .
       घोडावत समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या वेबिनारचे स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचलन घोडावत पॉलीटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी व प्रा . सोहन  तिवडे यांनी केले यावेळी प्रा . आर . पी . धोंगडी प्रा . सागर चव्हाण सुधाकर निर्मळे, सदानंद कुलकर्णी, रघुवीरसिंह राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
        फोटो -
 घोडावत पॉलिटेक्नीक येथील ऑनलाईन वेबिनारमध्ये संवाद साधतांना प्राचार्य विराट गिरी ,प्रा . सोहन तिवडे ,प्रा . आर . पी . धोंगडी प्रा . सागर चव्हाण , सुधाकर निर्मळे , सदानंद कुलकर्णी

No comments:

Post a Comment