हातकणंगले/ प्रतिनिधी
मिलींद बारवडे
दहावी, बारावी व उच्च माध्यमिक शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षेची अचुक व योग्य तयारी करून सहजासहजी यशस्वी होणेसाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर अँडमिनीस्ट्रेटीव्ह सर्व्हिसेसच्या वतीने मोफत ऑनलाईन मार्गदर्शन करणार असलेचे प्राचार्य विराट गिरी यांनी सांगितले .ऑनलाईन मार्गदर्शन पोलीस उपअधिक्षक व सी -सॅट विषय तज्ञ प्रणिल गिल्डा करणार आहेत . परीक्षेमधील संधी व आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. ऑनलाईन मार्गदर्शन गुरुवार, दि .९ जुलै २०२० रोजी , दुपारी ३.०० वाजता. सुरु होणार आहे .
प्रमुख मार्गदर्शक प्रणिल लता प्रफ्फुल गिल्डा यांची २०१६ साली MPSC च्या माध्यमातून DY. SP/ACP या पदावर यशस्वी निवड झालेली आहे. MPSC - अभ्यासक्रमातील C - SAT या विषयाचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. तसेच या विषयावर त्यांनी स्वतः चे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. You Tube च्या माध्यमातून वेळोवेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. स्पर्धा परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी. एम.पी.एस.सी. /यु.पी.एस.सी. मधील परीक्षा पद्धत कशी असते . अभ्यासक्रम, शासकीय सेवेतील विविध पदे आणि वेगवेगळ्या शासकीय सेवांच्या निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षा,यु. पी. एस. सी.साठी ‘आयएएस प्लॅनर’ व एमपीएससीसाठी ‘एमपीएससी प्लॅनर’ या दोन्ही गोष्टी तसेच परीक्षासंदर्भातील आपल्या सर्व शंका दूर होतील.
या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या स्पर्धा परीक्षांची तयारी दहावी, बारावीपासून केली तर लवकर यश मिळविणे शक्य होते. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी व पालक यांना या मार्गदर्शनातून मिळणार आहे. अशा परिस्थितीत तज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळाले . तर विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करणे व अधिकारी होणे हे अगदी सोपे होऊ शकते .ऑनलाईन वेबिनार मोफत असून सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यानी या संधीचा आवर्जून लाभ घ्यावा. असे आवाहन प्राचार्य गिरी यांनी केले आहे .
No comments:
Post a Comment