एस. एम. वाघमोडे
गांधीनगर : प्रतिनिधी
गांधीनगर (ता. करवीर) येथील चिंचवाड रोडवरील कोकण सेवा ट्रान्सपोर्टच्या मागील बाजूच्या गाळ्यामध्ये गांधीनगर पोलीसानी छापा टाकून दोघांकडून 2 लाख 56 हजार 850 रुपयांचा गुटका जप्त केला. मुलचंद बाशूमल निरंकारी (वय 61, रा. शिरू चौक गांधिनगर) व मनीष लखीराम वधवा (वय 24, रा. कोयना कॉलनी, गांधिनगर) अशी दोघा अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती गुरुवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली.
गांधीनगर पोलिसांना पेट्रोलिंग करीत असताना ट्रान्सपोर्ट लाईनला गुटका आनून तो विक्री होत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस कर्मचारी कोकण सेवा ट्रान्सपोर्टच्या मागील बाजूस गेले. तेथे असलेल्या गाळ्यात निरंकारी व वधवा या दोघा जणांसह गुटका मोठ्या प्रमाणात आढळून आला. अन्नसुरक्षा व मानद कायद्यानुसार गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 56 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या छापा टाकलेल्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक मलमे, हवालदार मोहन गवळी, आकाश पाटील, आयुब शेख, विराज डांगे, अशोक पवार, बालाजी हंगे व संजय कोल्हे यांचा समावेश होता.
No comments:
Post a Comment