Sunday, 5 July 2020

प्रा. बसवंत पाटील यांचा प्रिन्स शिवाजीनगर नागरिकांतर्फे सत्कार


      कसबा बावडा :
कसबा बावडा मधील  " प्रा बसवंत पाटील  यांची महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टिचर्स असोशिएशनच्या राज्य कोअर कमिटी सदस्यपदी निवड झालेबद्दल प्रिन्स शिवाजी कॉलोनीतर्फे सत्कार करण्यात आला . राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11 चे केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील,सामाजिक कार्यकर्ते सदाशिव सुतार,यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.प्रा पाटील हे गौराई फौंडेशन , कोल्हापूरचे  संस्थापक अध्यक्ष व अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज , नवी दिल्ली या संघटनेच्या कोल्हापूर  जिल्हाध्यक्षपदी कार्यरत आहेत. तसेच ते " कोल्हापूर डिस्ट्रिक्ट प्रोफेशनल टिचर्स असोशिएशनचे संचालक या पदावर शैक्षणिक कार्य करीत आहेत.
     या वेळी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रीकांत सूर्यवंशी,हे होते.प्रा पाटील हे एक शैक्षणिक विकासासाठी योगदान देत असतात.त्यांनी आतापर्यंत गोरगरिबांच्या मुलांसाठी स्वतःची पदरमोड करून वेळ व पैसा खर्च केला आहे.असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी नगरातील अनिकेत कदम, अमर माने, सामाजिक कार्यकर्ते कृष्णात गवळी, विकी खामकर, राजू चव्हाण, सुयश कदम,सत्यजित आगळे, सदाशिव सुतार, सुदाम पोवार, अजित पाटील, वसंत पोवार,मनोज पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment