एस. एम. वाघमोडे
गांधीनगर प्रतिनिधी
उचगाव (ता.करवीर) येथे मुख्य रस्त्यावर वसंत प्लाझा समोर राहणारा युवकाचा कोरोना अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याने उचगाव मुख्य रस्ता सील करण्यात आला आहे. संबंधित युवकाला श्वसनाचा त्रास होत असल्याने तो एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत होता.
त्या युवकाचा गांधीनगरात ट्रान्सपोर्ट व्यवसाय असून उचगाव मध्ये तो राहतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती ची माहिती घेण्याचे काम दिवसभर चालू होते.उपचार केलेल्या खाजगी डॉक्टर सह घरातील पत्नी, मुले बहीण यांचेसह सहा ते सात जणांना तपासणीसाठी सी पी आर रुग्णालय येथे नेण्यात आले आहे.उचगाव गावभागात पहिलाच रुग्ण सापडला आहे.तर मणेरमळा मोळे कॉलनी येथील पती पत्नी इचलकरंजी येथे कार्यक्रमांनिमित्त गेले असता ते कोरोना पॉझिटिव्ह आले.त्यांमुळे कोरोना पॉझिटिव्हची संख्या तीन झाली आहे
उचगाव मुख्य कमानीपासून ते दोस्ती ग्रुप पर्यंत रस्ता बॅरिकेट लावून ग्रामपंचायत ने बंद केला आहे तसेच सर्व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.सरपंच मालुताई काळे, उपसरपंच मनीषा गाताडे, तलाठी महेश सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी अजित राणे, ग्रामपंचायत सदस्य अनिल दळवी, विनायक जाधव,रमेश वाईंगडे,मधुकर चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र चौगुले व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी परिसर सील केला.
उचगाव मध्ये पहिलाच रुग्ण सापडला आहे.तर मणेरमळा मोळे कॉलनी येथील पती पत्नी इचलकरंजी येथे कार्यक्रमांनिमित्त गेले असता ते कोरोना पॉझिटिव्ह आले.त्यांमुळे कोरोना पॉझिटिव्हची संख्या तीन झाली आहे. उचगावमध्ये सर्व व्यवहार दुकाने भाजीपाला मार्केट तीन दिवस बंद करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment