Saturday, 11 July 2020

गांधीनगर पोलीस ठाणेत कोरोना विरुध्द लढणा-या योध्यांना साहीत्य वाटप.............


उंचगाव प्रतिनिधी
कोरोनाच्या जागतिक महामारीच्या लढ्यात योगदान देणा-या पोलीस बाधंवाना नाबार्डची उपकंपनी असणा-या नँबफिन्स लिमीटेड, बंगलोर जिल्हा व विभागीय कार्यालय कोल्हापूर यांचे मार्फत मास्क, सँनिटायझर,फेस शिल्ड चे वितरण करणेत आले. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लाँकडाऊनच्या काळात आपला जीव धोक्यात घालून पोलीस ठाणेंअंतर्गत येणा-या सर्व गावामध्ये जाऊन लोकांना जागृत करण्याचे काम व शासनाने दिलेल्या अटी व नियमांचे पालन करण्यास व ह्या आजाराविषयी जागृती करण्याचे काम आपले सर्व पोलीस बांधव रात्रंदिवस करीत आहेत. त्यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून वरील साहित्याचे वितरण गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहा.पो.नि.मा.दिपक भांडवलकर यांचेकडे नँबफिन्स लिमी, चे जीएम. किर्तीकुमार चव्हाण, डीएम. सागर रामदासी, गडमुडशिंगी येथील शाम स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष संजय भोपळे यांचे हस्ते करणेत आले. यावेळी शाम संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. जुईली सुतार, सौ. जयश्री नाईक,सौ. स्वाती भोपळे ठाणे अमलदार अरविंद कांबळे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक संजय भोपळे यांनी केले.आभार चेतन मुळीक यांनी मानले.

No comments:

Post a Comment